S M L

मुंबईकरांना गारेगार दिलासा, एसी लोकल 15 मेपासून ट्रॅकवर !

Sachin Salve | Updated On: Apr 21, 2016 06:52 PM IST

मुंबईकरांना गारेगार दिलासा, एसी लोकल 15 मेपासून ट्रॅकवर !

मुंबई, 21 एप्रिल : घामाघुम झालेल्या मुंबईकरांना राज्य सरकारने गारेगार दिलासा दिलाय. 15 मेपासून एसी लोकल धावणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. तसंच मुंबईत लवकरच सिंगल तिकीट प्रणाली राबवण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे बस,मेट्रो आणि लोकलचा प्रवास एकाच तिकीटावर करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

mumbai_Ac_local . उन्हाळ्यात लोकलमधील मुंबईकरांचा प्रवास हा घामांच्या धाराने ओला चिंब असाच असतो. मुंबईकरांची यातून सुटका करण्यासाठी एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर मागील महिन्यात एसी लोकल मुंबईत दाखल झाली. काही चाचण्यानंतर एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुरेश प्रभू यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत एसी लोकल 15 मेपासून धावणार यावर शिक्कामोर्तब झालंय. मात्र, एसी लोकलचं भाडं किती असणार हे मात्र निश्चित झालेलं नाही. त्याचबरोबर मुंबईत लवकरच सिंगल तिकीट प्रणाली राबवण्यात येणार आहे. त्यामुळे बस, मेट्रो, लोकलसाठी एकच तिकीट आकारण्यात येणार आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

prabhu_cm3त्यासोबतच मुंबईतल्या सर्व स्टेशन्सवर टप्प्याटप्प्यानं वायफाय सुविधा पुरवण्यात येणार आहे. याआधी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन वायफाय करण्यात आलंय. तसंच छत्रपत्री शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटी स्टेशन नव्यानं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रेल्वे स्टेशन्सवर टॉयलेट, सरकते जिने बांधण्यात येणार आहे.

त्याचबरोबर सीएसटी आणि चर्चगेट स्टेशन जोडण्यात येणार असल्याची मोठी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. सीएसटी आणि चर्चगेट स्टेशन भुयारी मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. तसंच वांद्रे ते विरार गर्दीचा विचार करत एलिव्हेटेड ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईत अनेक रेल्वे प्रकल्प 20 वर्षांपासून रखडले आहेत. हे प्रकल्प एसपीव्हीच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक करणार असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.

सीएसटी स्टेशनचं नविन मॉडेल असं असेल

- हार्बरचे दोन्ही ट्रॅक डबलडेकर होणार

- सर्व प्लॅटफॉर्म नविन करणार, छत काढून नविन टाकणार

- स्टेशनच्या बाहेर शिवाजीमहाराजांच्या सात किल्यांच्या प्रतिकृती ठेवणार

- शिवनेरी किल्याच्या प्रतिकृतीवर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा असेल

- समोर आझाद मैदान, आझाद मैदानाच्या खाली मेट्रो स्टेशन

- सीएसटी आणि मेट्रो स्टेशन भुयारी मार्गांनी एकमेकांना जोडणार तसंच हे दोन्ही स्टेशन्स चर्चगेटला भुयारी मार्गानं जोडणार

- प्रवेशद्वार आणखी सुसज्ज करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2016 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close