S M L

पीएचडीचा काळाबाजार करणारी गीता पाटील मोकाट, विद्यार्थ्यांचीच मुस्कटदाबी

Sachin Salve | Updated On: Apr 2, 2016 05:26 PM IST

02 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी केली जातेय. विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे आणि पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांवर आंदोलन करू नये यासाठी दडपशाहीचा वापर करताहेत. दुसरीकडे अजूनही पीएचडीचा काळाबाजार करणार्‍या गीता पाटील यांच्यावर कोणताही कारवाई झाली नाही.bamu_phd33

आयबीएन लोकमतनं पीएचडीचा विद्यापीठातला काळाबाजार चव्हाट्यावर आणला. विद्यापीठानं दोषी रेणुका बडवणे-भावसार गाईडवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, डॉ.गीता पाटीलला कुलगुरू चोपडे पाठीशी घालत आहे. गीता पाटील हिच्यावर कारवाईची मागणी करणार्‍या विद्यार्थ्यांवर कुलगुरू यांनी पोलिसांत गुन्हे दाखल केले. आता कुलगुरू पोलीस प्रशासनाला हाताशी धरून विद्यार्थ्यांना आंदोलनास परवानगी मिळू देत नाहीत. केवळ गीता पाटील हिला वाचवण्यासाठी कुलगुरू विद्यार्थ्यांवर दडपशाहीचा वापर करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना संतापलेल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठातलं वातावरण स्फोटक बनलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2016 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close