S M L

मुलांना नवे कपडे नाही, फटाके नाही !, बळीराजाची दिवाळी

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2015 11:30 AM IST

मुलांना नवे कपडे नाही, फटाके नाही !, बळीराजाची दिवाळी

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद

10 नोव्हेंबर : सगळीकडे दिवाळीचं प्रसन्न वातावरण आहे.. लोक खरेदी करताहेत... शहरांमध्ये बाजारपेठा आकाशदिव्यांनी झगमगत आहेत. मराठवाड्यातल्या ग्रामीण भागामध्ये मात्र वातावरण थोडं उदासीन आहे. इथल्या दिवाळीवर दुष्काळाच्या छायेचा परिणाम आहे. मात्र म्हणून शेतकर्‍यानं हार मानलेली नाही. आहे त्या परिस्थितीत दिवाळी साजरी करायचा त्यांचा प्रयत्न आहे.

औरंगाबाद तालुक्यातलं टाकळी माळी गावातलं हे भाटे कुटुंब...दिवाळीची तयारी सुरू आहे. या कुटुंबातल्या मायलेकी घर सारवून स्वच्छ करत आहेत. कारण रंगासाठी पैसे नाहीत. कुटुंबप्रमुख रावसाहेब भाटे अर्धांग वायूमुळे अपंग आहेत. घरी 2 एकर शेती, त्यामध्ये गेल्या 4 वर्षांपासून पीक नाही. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी पैसे नाहीत. तरीही जमेल तशी दिवाळी साजरी करायचीच आहे.

भाटे कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत. पण कपडे, फटाके मिळत नाहीत म्हणून ते नाराज नाहीत. घरच्या परिस्थितीची त्यांना कल्पना आहे. ही अशी परिस्थिती मराठवाड्यातल्या काही शेतकर्‍यांच्या घरांमध्ये आहे. पण त्यामुळे सणाचा आनंद कमी करून चालत नाही.

दिवाळीच्या तोंडावर कापूस, सोयाबीन, ज्वारी विकून शेतकरी दिवाळी धुमधडाक्यात साजरी करीत असे..मात्र गेल्या चार वर्षांपासून शेती पिकलीच नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी गेल्या पाच वर्षात मोठी दिवाळी साजरीच केली नाही.

शेतकरी आपला पोशिंदा.. मात्र निसर्गान अवकृपा केल्यानं संकटात सापडलाय. त्यातून स्वतःला सावरत हा शेतकरी दिवाळी साजरी करतोय. मात्र जे करत नाहीयेत, त्याच्या दारासमोर दिवाळीची पणती कशी पेटेल याचा विचार आपण केलाच पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2015 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close