S M L

ज्येष्ठ कवी, समीक्षक आणि चित्रकार दिलीप चित्रे यांचं निधन

10 डिसेंबर ज्येष्ठ कवी, समीक्षक आणि चित्रकार दिलीप पुरषोत्तम चित्रे यांचं गुरूवारी पहाटे 4 च्या सुमारास पुण्यात राहत्या घरी निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. गेले वर्षभर ते कॅन्सरने आजारी होते. सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लेखक, समीक्षक आणि उत्तम चित्रकार अशी चित्रेंची ओळख. चित्रें यांचा जन्म 17 सप्टेंबर 1938 रोजी बडोदा इथे झाला. एकूण कविता, कवितेनंतरच्या कविता, पुन्हा तुकाराम ही त्यांची अतिशय गाजलेली पुस्तकं. वयाच्या 19 व्या वर्षी मौज प्रकाशनाने दिलीप चित्रे यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला. तेंव्हापासून आजपर्यंत मराठी कवितेत, त्याचबरोबर समीक्षक म्हणून चित्रेंना अतिशय महत्वाचं स्थान होतं. चित्रेंचा पहिला कवितासंग्रह- 1960मध्ये प्रकाशित झाला. 'शतकाचा संधीकाल', 'शीबा राणीच्या शोधात' ही मराठी पुस्तकं तर 'ट्रॅव्हलिंग इन द केज' हे त्यांचं इंग्रजी पुस्तकही खुप गाजलं. 'चाव्या', 'तिरकस चौकस' हे त्याचं समीक्षात्मक लेखनही प्रसिद्ध आहे. 'मिठू मिठू पोपट', 'सुतक' हे स्तंभलेखनही त्यांनी केलं. 1969मध्ये त्यांनी पहिला सिनेमा केला. त्यानंतर त्यांनी अनेक शॉर्टफिल्म्स आणि डाक्युमेंटरी केल्या. भाऊ पाध्येंच्या कथेवर 'गोदाम' हा सिनेमा त्यांनी केला. कॉपीरायटर, ट्रान्सलेटर, शिक्षक, गुरुकुल चालवणारा कवी, अशी त्यांची बहुआयामी ओळख होती. 'जागरूकता म्हणजेच जगणं' ही अशी जगण्याची व्याख्या करणारा हा साहित्यविश्वातला जागल्या आता आपल्यातून कायमचा निघून गेलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2009 08:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2009 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close