S M L

माफी मागा,नाहीतर कायदेशीर कारवाई; ओवेसींची प्रणितींना नोटीस

Samruddha Bhambure | Updated On: Nov 9, 2014 04:34 PM IST

 माफी मागा,नाहीतर कायदेशीर कारवाई; ओवेसींची प्रणितींना नोटीस

09 नोव्हेंबर : एमआयएम हा राजकीय पक्ष देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप करणार्‍या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना आज एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार ओवेसी असादुद्दीन ओवेसी यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. आठ दिवसांत जाहीर माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा, असा इशाराच प्रणिती यांना नोटिसीमध्ये देण्यात आलाय.

काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एमआयएमवर जळजळीत टीका केली होती. 'एमआयएम हा देशविरोधी पक्ष आहे. त्यांच्या नेत्यांची भाषणं ऐकली, तर त्यांच्यात आणि अतिरेक्यांमध्ये काहीच फरक नाही, अशा पक्षांवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी प्रणिती यांनी केली होती. त्यांच्या या मागणीवर एमआयएमचे नेते भलतेच भडकले. पक्षाचे प्रमुख असादुद्दीन ओवेसी यांनी प्रणिती शिंदे आणि काँग्रेसला लक्ष्य केलं. आम्हाला देशद्रोही म्हणता, मग लोकसभेत काँग्रेसनं आमचा पाठिंबा का घेतला, असा संतप्त सवाल त्यांनी केला. आमची भाषणं आक्षेपार्ह वाटत असतील तर पोलिसांत जा, असं प्रत्युत्तरही त्यांनी प्रणिती यांना दिलं. तसंच, एमआयएमची माफी न मागितल्यास बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावर प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भुमिका घेत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून कुणाचीही माफी मागणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अधिकच खवळलेल्या एमआयएमनं प्रणिती यांना कायदेशीर नोटीसच बजावली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close