S M L

आदित्यनाथांच्या पावलावर केजरीवालांचे पाऊल, दिल्लीतही सुट्ट्यांमध्ये कपात

महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळांना असलेल्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2017 10:38 PM IST

आदित्यनाथांच्या पावलावर केजरीवालांचे पाऊल, दिल्लीतही सुट्ट्यांमध्ये कपात

28 एप्रिल : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी कामाचा धडका लावलाय. आता त्यांनी महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळांना असलेल्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाची काॅपी करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हाच निर्णय लागू केलाय.

योगी आदित्यनाथ यांनी एकापाठोपाठ धडाकेबाज निर्णय घेऊन टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलंय. आता त्यांनी १५ सार्वजनिक सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलाय. यात महापुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथीच्या आहेत. आदित्यनाथ यांच्या सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत दिल्लीतही अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळांना असलेल्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.  मनीष सिसोदिया यांनी याबद्दल मुख्य सचिवांना तसे आदेशही दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 10:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close