S M L

वाडियार या शाही कुटुंबाला 400 वर्षांनी मिळाला वारस

याआधी कुठल्याच राजाला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. येणारा प्रत्येक राजा हा दत्तक घेतलेला होता. आतामात्र राजा यदूवीर आणि त्रिशिका यांच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला आहे. आतापर्यंत वाडियार राजघराण्याचा वारस हा दत्तक घेतला जात होता. राणी प्रमोदा आणि राजा श्रीकांतदत्ता यांना मूल नसल्यामुळे त्यांनी राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना दत्तक घेतलं होतं.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 8, 2017 08:48 AM IST

वाडियार या शाही कुटुंबाला 400 वर्षांनी  मिळाला वारस

म्हैसूर, 08 डिसेंबर: वाडियार या शाही कुटुंबाला 400 वर्षांनी वारस मिळाला आहे. राजपुत्राच्या जन्मामुळे राजघराण्यात आनंद साजरा केला जातोय.

म्हैसूर राजघराण्यातील वाडियार कुटुंबात कधीही नैसर्गिक वारस मिळणार नाही, असा त्यांना शाप मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या शापातून मुक्तता झाल्याची भावना वाडियार कुटुंबीयांमध्ये आहे.

याआधी कुठल्याच राजाला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. येणारा प्रत्येक राजा हा दत्तक घेतलेला होता. आतामात्र राजा यदूवीर आणि त्रिशिका यांच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला आहे. आतापर्यंत वाडियार राजघराण्याचा वारस हा दत्तक घेतला जात होता. राणी प्रमोदा आणि राजा श्रीकांतदत्ता यांना मूल नसल्यामुळे त्यांनी राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना दत्तक घेतलं होतं. पण आता राजा यदूवीर यांना पुत्ररत्न झाल्यामुळे हा शाप संपल्याची भावना आहे. हा शाप संपावा यासाठी वाडियार राजे अनेक वर्ष प्रयत्नशील होते. ज्या राणीने शाप दिला तिचं मंदिरही उभारलं होतं. तिची पूजाही केली होती. म्हणूनच हा शाप संपला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 08:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close