S M L

देशभरात मालवाहतूकदारांचा संप, डिझेलवर जीएसटी लावण्याची प्रमुख मागणी

ऑल इंडिया मोटर वाहतूक काँग्रेसनं हा संप पुकारलाय. देशभरातील ९३ लाख वाहतूकदार यात सामील होणार आहेत, राज्यातील १५ लाख तर मुंबईतील जवळपास १ लाख वाहतूकदार यात सहभागी होतील असा दावा संपकऱ्यांनी केलाय.

Sonali Deshpande | Updated On: Oct 9, 2017 01:12 PM IST

देशभरात मालवाहतूकदारांचा संप, डिझेलवर जीएसटी लावण्याची प्रमुख मागणी

09 आॅक्टोबर : आज देशभरात मालवाहतूकदारांचा संप आहे. उद्याही हा संप असणार आहे. ऑल इंडिया मोटर वाहतूक काँग्रेसनं हा संप पुकारलाय. देशभरातील ९३ लाख वाहतूकदार यात सामील होणार आहेत, राज्यातील १५ लाख तर मुंबईतील जवळपास १ लाख वाहतूकदार यात सहभागी होतील असा दावा संपकऱ्यांनी केलाय.

जीएसटी, डिझेलच्या वाढलेल्या किंमती, टोलचे प्रश्न तसंच वाहतूक विभाग, वाहतूक विभागात होणारा भ्रष्टाचार या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मुंबईतल्या मानखुर्द भागात आंदोलन होणार आहे.

मालवाहतूकदारांच्या मागण्या काय आहेत?

  •  जीएसटीचे नियम सोपे करा
  • डिझेलवर प्रत्येक राज्यात वेगळा कर नको, जीएसटी लागू करा
  • वाहतूक खात्यातल्या भ्रष्टाचाराला आळा घाला

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2017 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close