S M L

लालू यादव यांना सुप्रीम कोर्टाचा दणका,चारा घोटाळ्याची होणार पुन्हा सुनावणी

लालूंच्या प्रत्येक खटल्याची वेगवेगळी सुनावणी करण्याचे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेत. लालूंना जामिनासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 8, 2017 11:59 AM IST

लालू यादव यांना सुप्रीम कोर्टाचा दणका,चारा घोटाळ्याची होणार पुन्हा सुनावणी

08 मे: चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दणका मिळालाय. लालूंच्या प्रत्येक खटल्याची वेगवेगळी सुनावणी करण्याचे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेत.

लालूंना जामिनासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे.

संपूर्ण चारा घोटाळा प्रकरण एकच आहे. त्यामुळे लालूंविरोधात प्रत्येक प्रकरणाची वेगळी सुनावणी घेऊ नये असा आदेश देताना झारखंड उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील कारस्थान रचल्याचा आरोप  रद्द केला होता. या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

20 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता. लालूंनीही त्यांना सुनावण्यात आलेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढले होते.

 काय आहे हा घोटाळा?

बिहारचा चाईबासा गोदामातील चारा घोटाळा

* 950 कोटी रुपयांचा हा चारा घोटाळा

* 1990 सालातील घोटाळा

* तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि तत्कालीन अधिकाऱ्यांवर घोटाळा केल्याचा आरोप

* या संदर्भात सुप्रीम कोर्टात 20 एप्रिलला अंतिम सुनावणी झाली

* झारखंड कोर्टाने लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात सुरू असलेली केस बंद केली होती

* मात्र सीबीआयनं लालू आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी षडयंत्र रचून घोटाळा केल्याचा दावा केला होता

* झारखंड कोर्टानं लालू यांना क्लीनचीट दिल्यानंतर सीबीआयनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती

* यावर आज अंतिम फैसला होणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2017 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close