S M L

सुप्रीम कोर्टानं वाढवली अनिश्चित काळासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत

पुढील निर्णय येईपर्यंत ही मुदतवाढ असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Sonali Deshpande | Updated On: Mar 13, 2018 07:07 PM IST

सुप्रीम कोर्टानं वाढवली अनिश्चित काळासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत

13 मार्च : सुप्रीम कोर्टानं  बँक खातं आणि  मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील निर्णय येईपर्यंत ही मुदतवाढ असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्याची 31 मार्चची मुदत रद्द करण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं देशभरातल्या कोट्यवधी आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालय पुढचा निर्णय देईपर्यंत आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्याची सक्ती नसेल असा महत्त्वाचा निर्णय सुर्वोच्च कोर्टानं दिलाय. फक्त मोबाईल आणि बँक खातेच नव्हे तर 131 प्रकारच्या सरकारी योजनांसाठी हा निर्णय लागू असेल.

याचा अर्थ या 131 सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढच्या निर्णयापर्यंत आधार कार्ड क्रमांक सलग्न करण्याची सक्ती नसेल. आधार कार्डच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं हा महत्त्वाचा अंतिरम आदेश दिलाय.

येत्या ३१ मार्चपर्यंत बँक खातं आणि मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत होती. सर्वोच्च न्यायालयात आज याप्रकरणी सुनावणी होती. त्यावर 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं ही मुदतवाढ दिली. सरकार याप्रकरणी कोणावरही बळजबरी करू शकत नाही असं मत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नोंदवले.

31 मार्चपर्यंत आधार कार्ड बँका, फोन यांना लिंक करणं बंधनकारक होतं. जनतेनं ती प्रक्रिया सुरूही केली होती. पण आता कोर्टाच्या या निर्णयानं सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय.

कोणकोणत्या कारणांसाठी आधार लिंक करावं लागणार होतं?

पॅन कार्ड

बँक अकाऊंट

मोबाईल नंबर

शेअर स्टॉक्स

क्रेडिट कार्ड

एलपीजी कनेक्शन,

इन्शुरन्स

पीपीएफ

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

किसान विकास पत्र

म्युच्युअल फंड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close