S M L

दिल्ली-एनसीआर, हरियाणाला भूकंपाचे धक्के

भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Jun 2, 2017 10:20 AM IST

दिल्ली-एनसीआर, हरियाणाला भूकंपाचे धक्के

02 मे : दिल्लीतील एनसीआर भागासह हरयाणातील काही भागात आज पहाटे साडे चारच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले.

दिल्ली-एनसीआर आणि पश्चिमी उत्तर प्रदेशातील काही परिसरात आज पहाटे ४.२६ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हरयाणामधील मोहानामधील जमिनीच्या १० कि.मी. च्या खाली असून भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, या भूकंपामुळे सुदैवाने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त अद्याप आले नाही. पण साखरझोपेच्या वेळी भूकंप आल्याने उत्तर भारतात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close