S M L

रामनाथ कोविंद यांना शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता

कोविंद यांच्या नावाबद्दल सेनेच्या गोटात सकारात्मकता आहे. सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोविंद यांना पाठिंबा देण्याबद्दल शिक्कामोर्तब होईल.

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2017 05:36 PM IST

रामनाथ कोविंद यांना शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता

19 जून : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलंय. कोविंद यांच्या नावाला शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली.

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव पुढे केलं होतं. मोहन भागवत यांचं नाव पुढे करून सेनेनं भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सेनेसोबत तोडगा काढण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर आज भाजपने राजनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं.

आता शिवसेनाही राजनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. कोविंद यांच्या नावाबद्दल सेनेच्या गोटात सकारात्मकता आहे. सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोविंद यांना पाठिंबा देण्याबद्दल शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close