S M L

'हिजबुल मुजाहिदीन'च्या कमांडरचा खात्मा, भारतीय लष्काराची मोठी कारवाई

Samruddha Bhambure | Updated On: May 27, 2017 03:28 PM IST

'हिजबुल मुजाहिदीन'च्या कमांडरचा खात्मा, भारतीय लष्काराची मोठी कारवाई

27 मे : पाकिस्तानच्या मदतीनं जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या 'हिजबुल मुजाहिदीन' या टोळीला भारतीय लष्कराच्या जवानांनी आज (शनिवारी) जोरदार दणका दिला. काश्मीरमधील त्राल इथे झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार अहमद ऊर्फ अबू झरार मारला गेला आहे.

सबजार अहमद हा बुरहान वाणी याचा अत्यंत जवळचा साथीदार होता. तो बुरहानसोबतच राहत होता. या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही प्रसिद्ध झाले होते. बुरहान मारला गेल्यानंतर हिजबुलच्या कारवायांची सूत्रं सबजारनं हाती घेतली होती. भटबरोबरच त्याचा आणखी एक साथीदार ठार झाला आहे. बुरहान वाणीचा साथीदार असलेला सबजार मारला जाणं हा दहशतवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दुसरीकडं, रामपूर सेक्टरमधील घुसखोरीचा डाव उधळून लावत भारतीय जवानांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मात्र, त्यानंतरही लष्करानं दहशतवाद्यांचा शोध सुरूच ठेवला होता. हा शोध सुरू असतानाच आज सकाळी पुन्हा एकदा दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये धूमश्चक्री उडाली. त्यात आणखी दोघे मारले गेले. या दोघांच्या खातम्यामुळं काल रात्रीपासून लष्करानं टिपलेल्या दहशतवाद्यांची संख्या आठ झाली आहे. भारतीय लष्कराचं हे मोठं यश मानलं जात आहे.

दरम्यान, या घटनेची बातमी पसरल्यानंतर काश्मीरमध्ये ठिकठिकाणी भारतीय जवानांवर दगडफेकीच्या घटना सुरू झाल्या आहेत.

कोण होता सबझार भट ?

  • 'अबू झरार' या टोपण नावाने ओळखला जायचा
  • बुरहान वाणीनंतरचा हिजबुलचा पोस्टरबॉय
  • बुरहानच्या खात्म्यानंतर 'हिजबुल'ची सूत्र सबझारकडे
  • वयाच्या 21व्या वर्षीच हिजबुलचा सदस्य बनला
  • हिजबुलच्या सोशल मीडिया कॅम्पेनचा मास्टरमाईंड
  • काश्मिरी तरुणांची माथी भडकवण्यात मोठा सहभाग
  • पुलवामा जिल्ह्यातल्या चकमकीत सबझारचा खात्मा
  • त्राल सेक्टरमध्ये 2 साथीदारांसह लपून बसला होता
  • सबझार भटवर होतं 10 लाखांचं बक्षीस
  • प्रेमभंगातून दहशतवादाकडे वळल्याचं बोललं जातं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2017 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close