S M L

40 वर्षात रिलायन्सची 4700 टक्क्यांनी वाढ

रिलायन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे शेअर्सही दर अडीच वर्षात दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

Sonali Deshpande | Updated On: Jul 21, 2017 01:20 PM IST

40 वर्षात रिलायन्सची 4700 टक्क्यांनी वाढ

21 जुलै: रिलायन्सच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार 40 वर्षात रिलायन्स कंपनीची 4700 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर रिलायन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे शेअर्सही दर अडीच वर्षात दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज देशातली सर्वात श्रीमंत हस्ती आहे. याच रिलायन्सची मार्केट कॅप 1997 साली फक्त 10 कोटी होती ती आता 5 लाख कोटीच्या पार गेली आहे. गेल्या एका वर्षात रिलायन्सच्या शेअर्सचे प्रदर्शन अत्यंत चांगले होते.

रिलायन्सचे गुंतवणूकदार मागच्या वर्षी मालामाल झाले आहेत. एका वर्षात कंपनीचे शेअर्स 55टक्क्यांनी , 9महिन्यात 46 टक्क्यांनी तर एका महिन्यात 12 टक्क्यांनी वाढले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close