S M L

आरबीआयचे पतधोरण जाहीर ,रेपो रेट पाव टक्क्याने कमी करून आता 6 टक्के

रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात केलीय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 2, 2017 03:09 PM IST

आरबीआयचे  पतधोरण जाहीर ,रेपो रेट पाव टक्क्याने कमी करून आता 6 टक्के

02 आॅगस्ट, प्रतिनिधी : रिझर्व बँकेनं आपलं पतधोरण जाहीर केलंय आणि अपेक्षेप्रमाणं रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात केलीय.

आता  घरांचे हप्ते कमी होणार आहेत. रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व बँकेकडून ज्या दरानं कर्ज घेतात तो दर. रेपो रेट आता ६ टक्क्यांवर आलाय. साडे सहा वर्षातला हा सर्वात कमी रेपो रेट आहे.

महागाई कमी झाल्यामुळे रिझर्व बँकेनं हा निर्णय घेतलाय. घरबांधणी क्षेत्राला यामुळे चालना मिळेल, तसंच घर घेणारे आणि उद्योजक, दोघांनाही कर्ज घेणं थोडं सोपं जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close