S M L

मुस्लिमांनीच पुढे येऊन 'तीन तलाक' प्रथा संपवावी -पंतप्रधान मोदी

"तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट मंजूर करणारी मुस्लिम समाजातील प्रथा ही मुस्लिम समाजातील सुशिक्षित लोकांनी एकत्र येऊन संपवली पाहिजे"

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2017 02:45 PM IST

मुस्लिमांनीच पुढे येऊन 'तीन तलाक' प्रथा संपवावी -पंतप्रधान मोदी

29 एप्रिल : तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट मंजूर करणारी मुस्लिम समाजातील प्रथा ही मुस्लिम समाजातील सुशिक्षित लोकांनी एकत्र येऊन संपवली पाहिजे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तसंच ट्रिपल तलाकच्या मुद्द्याला राजकारणाशी जोडू नये असंही मोदी म्हणाले.

दिल्लीतील विज्ञान भवनात थोर समाजसुधारक गुरू बसव जयंती निमित्ताने कार्यक्रम पार पडला यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ट्रिपल तलाकवर आपली भूमिका मांडली. ट्रिपल तलाक हा राजकीय मुद्दा नाहीये. तर मुस्लिम महिलांची ही हक्काची लढाई आहे. यासाठी मुस्लिम महिला स्वत:हुन समोर येत आहे. प्रत्येक मुस्लिम महिलांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे असंही मोदी म्हणाले.

ट्रिपल तलाकपासून या महिलांना वाचवण्यासाठी याच समाजातील लोकं समोर येत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.  मुस्लिम समाजाला मी आग्रह करतो की, मुस्लिम मुलींना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय. त्यासाठी शिक्षित लोकांनी पुढे येऊन त्यांच्यासाठी लढतील आणि यातून मार्ग निघेल अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली.

दरम्यान, मुस्लिम धर्मगुरू मोलाना साजिद रशिदी यांनी पंतप्रधानांचं विधान हे राजकीय आहे. मोदींनी इस्लाम धर्माचा सन्मान राखला पाहिजे त्यांनी असं बोलायला नको हवं होतं अशी टीका केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2017 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close