S M L

आता बँकेचं खातं होणार पोर्टेबल

बँक बदलली तरी नव्या बँकेत खाते क्रमांक कायम ठेवण्याची सुविधा लवकरच खातेधारकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रातील हे खूप मोठं पाऊल मानल जात आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 31, 2017 02:32 PM IST

आता बँकेचं खातं होणार पोर्टेबल

31 मे : तुमच्या मोबाईल क्रमांकाप्रमाणे आता लवकरच तुम्हाला बँकेचं खातंही पोर्टेबल करता येणार आहे. बँक बदलली तरी नव्या बँकेत खाते क्रमांक कायम ठेवण्याची सुविधा लवकरच खातेधारकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रातील हे खूप मोठं पाऊल मानल जात आहे.

तांत्रिकी अत्याधुनिकीकरणातून आधार कार्डशी बँकेचं खातं जोडण्यात आलं की ही सुविधा सहजपणे उपलब्ध करून देता येईल, असा विश्वास आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस.मुंद्रा यांनी व्यक्त केला. बँकिंग कोड्स अँड स्टॅण्डर्ड बोर्ड ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

अनेकदा नागरिकांनी नोकरी बदलली किंवा घर बदललं तरी दुसऱ्या बँकेत खातं उघडावं लागतं. आता पहिलाच खातं क्रमांक सगळीकडे वापरता आला की मग फार सोयीचं होऊन जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close