S M L

माझी खूप अफेअर्स झाली, माझं प्रेम शारीरिक नाही,अध्यात्मिक आहे - कंगना राणावत

या समिटमध्ये नेटवर्क 18 देशातील दिग्गज नेते, उद्योजकांशी संवाद साधणार आहे. हा सोहळा 17 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2018 10:58 PM IST

माझी खूप अफेअर्स झाली, माझं प्रेम शारीरिक नाही,अध्यात्मिक आहे - कंगना राणावत

Highlight

Mar 17, 2018

 • 20:45(IST)

  मी हृतिकचा किस्सा मागे सोडून आलीय - कंगना

 • 20:41(IST)

  मी कोणाला धोका दिला नाही. मलाच दर वेळी फसवलं गेलंय. मला सोडून गेलेला परत येतो. पण त्यावेळी माझ्या सोबत अजून एक लूझर असतो - कंगना

 • 20:38(IST)

  : १६ ते ३१ वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये प्रत्येक वेळा मलाच डम्प केलं, मी कधीच कुणाला डम्प केलं नाही, आणि आता असं वाटतंय, या लुझरने मला डम्प केलं - कंगना

 • 20:28(IST)

  माझी खूप अफेअर्स झालीत. प्रत्येक ब्रेकअपनंतर मला वाटायचं माझं लव्ह लाईफ संपलं. माझं प्रेम शारीरिक नाही, अध्यात्मिक आहे - कंगना राणावत

 • 20:23(IST)

 • 20:14(IST)

  मी मोदींची फॅन आहे. आज एक चहावाला पंतप्रधान झालेत. हा लोकशाहीचा विजय आहे - कंगना राणावत

 • 19:58(IST)

  पहा कंगना राणावत LIVE

 • 19:55(IST)

  आम्ही यंत्रांची आयात कमी कशी करता येईल, ते पाहतोय. आम्हाला जास्त हत्यारांची निर्मिती करायचीय आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लष्कराला तयार करायचंय. या तीनही गोष्टी वेगानं करायच्यात - सीतारमण

 • 19:48(IST)

  संरक्षणासाठीच्या  बजेटवर आम्ही खूश आहोत. आता लष्कराला आधुनिक करायचंय - संरक्षण मंत्री एन सीतारामन

 • 19:25(IST)

  योगी आदित्यनाथ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजप 80 जागा जिंकू शकतो

 • 19:10(IST)

  योगी आदित्यनाथ LIVE

 • 19:01(IST)

  योगी आदित्यनाथ म्हणाले की आम्ही सपा-बसपा युतीच्या विरोधात रणनीती बनवलीय. पण काय ते सांगायला त्यांनी नकार दिला.

 • 18:41(IST)

  प्रसून जोशींनी पद्मावतबद्दल सांगितलं. पद्मावतीमधला आय काढू टाकला. आम्ही तयार झालो कारण त्या काव्याचं ते नावच होतं. पण आम्ही 400 कट्स सुचवले, असं म्हणणं अजबच होतं. सिनेनिर्मात्यांनी सांगितलंही, सिनेमा जसा बनला होता तसा रिलीज झाला.

 • 18:33(IST)

  जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात जाता, तेव्हा आगीपासून सावध राहता. तसंच जेव्हा तुम्ही राजकारणात शिरता तेव्हा काही जण तुमच्यावर टीका करणार, याची तयारी ठेवायला हवी. माझ्या जबाबदाऱ्या आणि अधिकार याबद्दल मी जागरुक आहे. सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्कांबद्दल माहीत हवं. सकाळी उठल्यावर कमीत कमी एक तास स्वत:ला द्यायला हवा - स्मृती इराणी

 • 18:20(IST)

  स्मृती इराणी LIVE

संबंधीत बातम्या

===============================================================================================

भारताला जागतिक आर्थिक वाढीचा फायदा घेता आला नाही - रुचिर शर्मा

रायझिंग इंडिया हे भारतीयांच्या शक्तीचं प्रतिक-पंतप्रधान मोदी

राजकारणात काहीही घडू शकते, रायझिंग इंडिया समिट मध्ये नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य

#News18RisingIndia : पदापेक्षा कुणी मोठा नसतो -राजनाथ सिंह

चीनला मागे टाकून भारत होईल सुपर पाॅवर देश -नोबेल विजेते पाॅल क्रुगमन

===============================================================================================

17 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत न्यूज 18 चं राइजिंग इंडिया समिटला सुरुवात झाली. या समिटमध्ये  देशातील दिग्गज नेते, उद्योजकांशी संवाद साधला.

अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं म्हणजे रायझिंग इंडिया, भारताच्या 125 कोटी जनतेचा सन्मान म्हणजे रायझिंग इंडिया अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूज 18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया समिटचं कौतुक केलंय.

न्यूज 18 नेटवर्कने नवी दिल्लीत रायझिंग इंडिया समिटचं आयोजन केलं होतं. रायझिंग इंडियाचा अर्थ आहे, आपल्या सर्व नागरिकांचा विश्वास आणि इच्छा वाढवणे. माझ्यासाठी रायझिंग इंडियाचा अर्थ हा लोकांचा आत्मविश्वास वाढवणे आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "NO SILOS ONLY SOLUTIONS" हा आमचा उद्देश आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

तसंच रायझिंग इंडिया हे फक्त दोन शब्द नाही तर सव्वाशे कोटी भारतीयांच्या शक्तीचं प्रतिक आहे जे आता जग स्विकारत आहे. रायझिंग एक असा चेहरा आहे ज्यामुळे भारतीयांना गर्व होईल, भारताने फक्त आपल्याच नाहीतर पूर्ण जगाला विकासाची एक गती दिली असं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आपल्या सरकारच्या यशस्वी योजनाचा पाढा वाचला. आरोग्य सेवा लोकांसाठी सुलभ आणि स्वस्त असावी, यासाठी आम्ही अनेक पाऊलं उचलली. 'उज्जवला' योजनेमुळे स्वयंपाक घराचीच नाहीतर अनेक कुटुंबांचं चित्र बदललं आहे. कित्येक महिलांची धुरातून सुटका झाली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती, यात 13 हजार गावं ही पूर्व भारतातील होती, आम्ही सगळ्यांना वीज दिली, हा आहे रायझिंग इंडिया असं पंतप्रधान मोदींनी अभिमानाने सांगितलं.

2014 मध्ये आमचे सरकार आले तेव्हा वैद्यकीय क्षेत्रात 52 हजार जागा होत्या त्या आता 85 इतक्या वाढल्या आहेत. खरंतर सरकार आणि जनतेच्या सहभागामुळे देशाचा विकास होत असतो आम्ही

कमी वेळेत स्वच्छ भारत अभियान राबवलं आणि हे अभियान जनअभियान झालं हे लोकांनी पाहिलं आणि ते सहभागीही झाले. लोकांच्या इच्छाशक्तीमुळेच देशाचा विकास होऊ शकतो असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी आज पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल यांनी "द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ राइजिंग इंडिया" आपले परखड मतं मांडली. त्यानंतरच्या दुसऱ्या सत्रात नवी मार्ग नव्या आशा या विषयावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोरहलाल खट्टर सहभागी झाले होते. या वेळी सर्व मंत्र्यांनी त्यांच्या खात्याचं व्हिजन रायझिंग इंडिया कार्यक्रमात विशद केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2018 08:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close