S M L

मध्य प्रदेशात चक्क दोन पुरूषांचं लग्न लावलं !

मध्य प्रदेशातल्या इंदौरमध्ये चक्क पुरूषांचं लग्न लावण्यात आलंय. काय तर तिकडे म्हणे, दोन पुरुषांचं लावून दिलं तरच चांगला पाऊस पडतो.

Chandrakant Funde | Updated On: Aug 5, 2017 01:33 PM IST

मध्य प्रदेशात चक्क दोन पुरूषांचं लग्न लावलं !

इंदौर, वृत्तसंस्था 5 ऑगस्ट : मध्य प्रदेशातल्या इंदौरमध्ये चक्क पुरूषांचं लग्न लावण्यात आलंय. बरं हे दोन्ही समलैंगिकही नाहीत बरं मग तरीही या दोन पुरूषांचं लग्न नेमकं कशासाठी लावण्यात आलं असा प्रश्न तुम्हा पडलाच असेल तर त्याचं उत्तर आहे रूढी परंपरा...तिकडे म्हणे, दोन पुरुषांचं लावून दिलं तरच चांगला पाऊस पडतो. थोडक्यात आपल्याकडे जसं बेडकाचं पावसाळ्याच्या तोंडावर बेडकांचं लग्न लावलं जातं. तसाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल.

आश्चर्याची बाब म्हणजे, या दोन पुरूषांचा विवाह लावून देताच तिथे लागलीच धोधो पाऊस पडला देखील. अर्थात या पुरूषी विवाहाचा आणि पावसाचा वैज्ञानिकदृष्ट्या काहीच संबंध नाहीये पण तिथल्या लोकांची अंधश्रद्धाच तशी असल्यामुळे त्याला आपण तरी काय बोलणार म्हणा...

दरम्यान, इंदौर परिसरात पुढील आठवड्यात चांगला पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानेही वर्तवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close