S M L

जीएसटी म्हणजे गुड अँड सिम्पल टॅक्स -पंतप्रधान

'जीएसटी सर्वांच्या फायद्यांचा आहे, आता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका..जीएसटी म्हणजे गुड आणि सिम्पल टॅक्स आहे"

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2017 12:27 AM IST

जीएसटी म्हणजे गुड अँड सिम्पल टॅक्स -पंतप्रधान

30 जून :  जीएसटी सर्वांच्या फायद्यांचा आहे, आता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका..जीएसटी म्हणजे गुड आणि सिम्पल टॅक्स असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिला. तसंच  जीएसटी हे कोणत्या एका पक्षाचे श्रेय नाही ना हे कोणत्याही एका सरकारचं यश नाही असंही यावेळी पंतप्रधान म्हणाले.

संसद भवनात शुक्रवारी मध्यरात्री जीएसटी लाँचिंगचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. जीएसटीमुळे देशाच्या करप्रणालीत एक सुसूत्रता येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. जीएसटी लागू करण्यात सर्व तत्कालीन सरकारांचं योगदान असल्याने कोणताही एक राजकीय पक्ष त्याचं श्रेय घेऊ शकत नाही. असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. जीएसटी लागू केल्याने 23 प्रकारचे टॅक्स एकाच फटक्यात मोडीत निघालेत.

जीएसटीच्या निमित्तानं देश आता आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर वाटचाल करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. गीतामध्ये ज्याप्रमाणे 18 अध्याय आहेत त्याचप्रमाणे जीएसटी लागू करण्यासाठी 18 बैठका झाल्या. हा एक दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल. याचाही पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2017 12:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close