S M L

खोटं जात प्रमाणपत्र देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार

यात आतापर्यंत एक हजार ३८१ जणांची नावं आहेत. हा आकडा 2 लाखांपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळालीये.

Sonali Deshpande | Updated On: Dec 10, 2017 10:54 AM IST

खोटं जात प्रमाणपत्र देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार

10 डिसेंबर : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बोगस जात प्रमाणपत्र देणाऱ्यांवर सरकारनं अतिशय कडक कारवाई सुरू केलीये. हा गुन्हा करणाऱ्यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्याची कारवाई केली जाणार आहे. बोगस जात प्रमाणपत्र देणाऱ्यांची यादीच सरकारनं बनवायला घेतली आहे. यात आतापर्यंत एक हजार ३८१ जणांची नावं आहेत. हा आकडा 2 लाखांपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळालीये.

सरकारनंतर सर्व पालिका, जिल्हा परिषदा, शाळा तसेच महाविद्यालये, महामंडळं, तसेच सर्व निमसरकारी आस्थापना या ठिकाणच्या बोगस प्रमाणपत्र धारकांचा आढावा घेतला जाणार आहे..त्यामध्ये एकूण दीड ते 2 लाख असे कर्मचारी नोकरीला मुकतील अशी शक्यता आहे.

जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अश्या बोगस प्रमाणपत्र धारकांना कोणताही पर्याय न ठेवता नोकरीतून काढण्याचे आदेश दिले होते. पण डिसेंबरपर्यंत काहीही होत नाही हे पाहून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं सरकारला इशाराच दिलाय. पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ, अशी नोटीस संघटनेनं सरकारला दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close