S M L

नॉयडामध्ये एक्सेल ग्रीनटेक कंपनीला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2017 01:07 PM IST

नॉयडामध्ये एक्सेल ग्रीनटेक कंपनीला लागलेल्या आगीत  6 जणांचा मृत्यू

20 एप्रिल :  नॉयडामध्ये काल (बुधवारी) एका कंपनीला आग लागली, यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

नॉयडाच्या सेक्टर 11 मध्ये एक्सेल ग्रीनटेक या कंपनीला ही आग लागली होती.  आतमधल्या दारं बायोमेट्रिक पद्धतीनं उघडायची होती. म्हणजे दार उघडण्यासाठी अंगठा लावायला लागतो. ही प्रणाली आग लागल्यावर जॅम झाली. त्यामुळे आग लागल्यानंतर या 6 जणांना बाहेर पडता आलं नसावं, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

आग लागली त्यावेळी 15 जण कंपनीत होते. त्यातले 9 जण सुखरुप बाहेर पडले. तर एकानं वरून उडी मारली, त्यात तो जखमी झाली असून त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.

6 पैकी 3 जणांची ओळख पटलीय, तर 3 जणांचे मृतदेह अजून सापडायचे आहेत. त्यामध्ये कंपनीचे कार्यकारी संचालक संजोय दास यांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close