S M L

आयसिसच्या 3 संशयित दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांनी आयसिसच्या 3 संशयित दहशतवाद्यांना अटक केलीय.मुंबई, बिजनौर आणि जालंधरमधून या 3 जणांना अटक झालीय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 20, 2017 03:19 PM IST

आयसिसच्या 3 संशयित दहशतवाद्यांना अटक

20 एप्रिल : दिल्ली पोलिसांनी आयसिसच्या 3 संशयित दहशतवाद्यांना अटक केलीय.मुंबई, बिजनौर आणि जालंधरमधून या 3 जणांना अटक झालीय. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेश एटीएसची ही संयुक्त कारवाई होती.

मुंबई, पंजाब, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये हे ऑपरेशन झालं. अतिशय गुप्तपणे हे ऑपरेशन पोलिसांनी केलं.त्यांना केंद्रीय गुप्तचर विभागाचीही मदत झाल्याची शक्यता आहे. 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. त्यातले 3 जण मुंब्रा इथले आहेत.

हे तिघं एक मोठ्या दहशतवादी हल्ला करणार होते, असं कळतंय. त्यांची नावं अजून कळू शकलेली नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close