S M L

वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचं निधन

1991 मध्ये पी.व्ही. नरसिंव्हाराव पंतप्रधान झाले त्यानंतर चंद्रास्वामी चर्चेत आले.

Sachin Salve | Updated On: May 23, 2017 07:36 PM IST

वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचं निधन

23 मे  : वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचं आज निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

1991 मध्ये पी.व्ही. नरसिंव्हाराव पंतप्रधान झाले त्यानंतर चंद्रास्वामी चर्चेत आले. त्यांच्या भक्तगणांमध्ये ब्रुनेईचे सुलतान, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर, आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र दलाल अदनान खशोगी,मॉडेल आणि अभिनेत्री पामेला बोर्डस अशा अनेक नामांकीत आणि वादग्रस्त व्यक्ती होत्या.

त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप होते. सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधून आर्थिक फायदा घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2017 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close