S M L

मोदी सरकारच्या काळात गो रक्षकांचा उच्छाद; मुस्लिमांवरचे हल्ले वाढले!

विशेषतः यातले बहुतांश हल्ले हे गैरसमजातून केले गेले असून त्यात मुस्लिम समुदाय टार्गेट झाल्याचं हल्ल्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 28, 2017 04:47 PM IST

मोदी सरकारच्या काळात गो रक्षकांचा उच्छाद; मुस्लिमांवरचे हल्ले वाढले!

डिलेना अब्राहम, ओजस्वी राव

जून 28: देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गो रक्षकांच्या हल्ल्यात वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेषतः यातले बहुतांश हल्ले हे गैरसमजातून केले गेले असून त्यात मुस्लिम समुदाय टार्गेट झाल्याचं हल्ल्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय.

2014सालापासून देशात कथित गो रक्षकांकडून मुस्लिमांवर 63 घटना घडल्यात त्यापैकी 32 हल्ले हे भाजप शासित राज्यांमध्ये झालेत. यामध्ये 28 लोक मारले गेलेत त्यापैकी 24जण हे मुस्लिम होते याशिवाय 124 लोक अशा हल्लांमध्ये जखमी झालेत.

सर्वाधिक खेदाची बाब म्हणजे यातले जवळपास 52 टक्के हल्ले हे केवळ गैरसमजातून झाल्याचं तपासाअंती समोर आलंय. राष्ट्रीय स्तरावरील सामुहिक हल्ल्यांच्या आकडेवारी याचा स्पष्ट असा उल्लेख आढळून आला नसला तरी त्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतरच हे भयावह वास्तव समोर आलंय.

कथित गो रक्षकांचे वाढते हल्ले

कुठल्या राज्यात किती हल्ले ?

उत्तरप्रदेश 10

हरियाणा 9

गुजरात 6

कर्नाटक 6

मध्यप्रदेश 4

दिल्ली 4

राजस्थान 4

  • अधिक माहितीसाठी भेट द्या hindi.firstpost.com  या वेबसाईटला..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close