S M L

कोणत्याही फाईल्स लपवल्या नाहीत -पंतप्रधान

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2013 05:20 PM IST

Image img_237082_pm23423523_240x180.jpg03 सप्टेंबर : कोळसा खाण वाटप प्रकरणी सरकार काहीही लपवत नसल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं. सरकारनं सीबीआयला या प्रकरणात जवळपास एक लाखांपेक्षा जास्त फाईल्स दिल्या आहेत आणि यापुढेही सहकार्य करू असही पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.

कोळसा खाण घोटाळा प्रकरणातल्या गहाळ फाईल्सचा मुद्दा आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित झाला होता. आणि पंतप्रधानांनी याबाबत खुलासा करावा असा आग्रह धरला होता. आणि त्यानंतर पंतप्रधानांनी हे निवेदन केलं.

पंतप्रधान डॉ. मनमनोहन सिंग उद्या जी-20च्या शिखर परिषदेसाठी जात आहेत. त्यापूर्वी त्यांनी याप्रकरणी खुलासा करावा असा आग्रह विरोधकांनी धरला. त्यानंतर पंतप्रधान शून्य प्रहरानंतर राज्यसभेत निवेदन करतील असं काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2013 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close