S M L

वाळू माफियांचा ब्रिटिशकालीन वास्तूना ही धोका

03 फेब्रुवारीमनोहर बोडखे, दौंडअवैध आणि अतोनात होणार्‍या वाळू उपशामुळे दौंड जिल्ह्यातल्या भीमा नदीच्या पात्राचं तर नुकसान झालंच आहे. पण दौंड मनमाड लोहमार्गावरच्या ब्रिटीशकालीन पुलालाही धोका पोहोचत आहे.पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदीवरचा पूल. दौंड -मनमाड लोहमार्गावरचा हा ब्रिटिशकालीन पूल अत्यंत महत्वाचा आहे. एरवी तुडंुब पाण्याने भरलेलं भीमा नदीचं पात्रं सध्या खड्डेमय झालं आणि त्यामुळेच या पुलालाही धोका निर्माण झाला आहे. या पुलाच्या खांबांजवळच अगदी वेळीअवेळीही सर्रास वाळू उपसा केला जातो. साहजिकच हा पूल धोक्यात आला. मात्र दौंडचे तहसीलदार हनुमंत पाटिल यांनी आता यावर कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. या पुलाची सुरक्षितता ही रेल्वे प्रशासनाचीही जबाबदारी आहे. तसेच सोनवणेंच्या हत्येनंतर आता सामान्य नागरिकही अवैध कामांबाबत माहिती देण्याबाबत विचार करतायेत असं नागरिकांचं मत आहे. तर नागरिक असोत किंवा अधिकारी बेकायदेशीर कारवाई करणार्‍यांना संरक्षण मिळेल अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. दौंड हे महत्वाचं जंक्शन आहे. या बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रावरच्या इथल्या पुलाला तर धोका निर्माण झालाच आहे पण दौंडकरांनाही पाणीटंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2011 03:05 PM IST

वाळू माफियांचा ब्रिटिशकालीन वास्तूना ही धोका

03 फेब्रुवारी

मनोहर बोडखे, दौंड

अवैध आणि अतोनात होणार्‍या वाळू उपशामुळे दौंड जिल्ह्यातल्या भीमा नदीच्या पात्राचं तर नुकसान झालंच आहे. पण दौंड मनमाड लोहमार्गावरच्या ब्रिटीशकालीन पुलालाही धोका पोहोचत आहे.

पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदीवरचा पूल. दौंड -मनमाड लोहमार्गावरचा हा ब्रिटिशकालीन पूल अत्यंत महत्वाचा आहे. एरवी तुडंुब पाण्याने भरलेलं भीमा नदीचं पात्रं सध्या खड्डेमय झालं आणि त्यामुळेच या पुलालाही धोका निर्माण झाला आहे. या पुलाच्या खांबांजवळच अगदी वेळीअवेळीही सर्रास वाळू उपसा केला जातो. साहजिकच हा पूल धोक्यात आला. मात्र दौंडचे तहसीलदार हनुमंत पाटिल यांनी आता यावर कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. या पुलाची सुरक्षितता ही रेल्वे प्रशासनाचीही जबाबदारी आहे. तसेच सोनवणेंच्या हत्येनंतर आता सामान्य नागरिकही अवैध कामांबाबत माहिती देण्याबाबत विचार करतायेत असं नागरिकांचं मत आहे. तर नागरिक असोत किंवा अधिकारी बेकायदेशीर कारवाई करणार्‍यांना संरक्षण मिळेल अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. दौंड हे महत्वाचं जंक्शन आहे. या बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रावरच्या इथल्या पुलाला तर धोका निर्माण झालाच आहे पण दौंडकरांनाही पाणीटंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2011 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close