S M L

देशमुख सरकारची चार वर्ष पूर्ण

01 नोव्हेंबर-मुंबई,मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यात मराठी - अमराठी वाद पेटलेला असताना विलासराव देशमुख आज मुख्यमंत्री पदाची चार वर्ष पूर्ण करत आहेत. एक नोव्हेंबर 2004 रोजी विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही विलासरावांची मुख्यमंत्री म्हणून दुस-यांदा शपथ होती. या चार वर्षाच्या काळात सरकारला अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. विलासराव देशमुख सरकार सत्तेवर येऊन सात महिने होत असतानाच 26 जुलै 2005 रोजी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी भयानक पूर आला. 1100 लोक मरण पावले. राज्याचं दहा हजार कोटींचं नुकसान झालं. केंद्रातील काँग्रेस सरकारच्या मदतीनं राज्य सावरलं.शेतक-यांच्या आत्महत्येवरून देशमुख सरकारची बदनामी झाली. पण पुन्हा केंद्र सरकारनं देशभरात 70 हजार कोटी रुपयांचं शेतक-यांचं कर्ज माफ केलं त्याचा फायदा महाराष्ट्रात देशमुख सरकारला झाला. शेतक-यांना मोफत वीज. 2000 सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देणं या जाहिरनाम्यातली आश्वासनं सरकारनं पाळली नाही. पण मुंबईच्या विकासासाठी दीड हजार कोटी देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं. पाच वर्षात एक कोटी रोजगार सरकार देणार होतं. 20 लाख लोकांना रोजगार दिल्याचा सरकारचा दावा आहे. नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानं देशमुख सरकारची राजकीय अस्थिरता संपली. पण विलासराव स्वत: अस्थिर बनले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 10:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close