S M L

अशोक चव्हाणांचं काम बेपत्ता आहे - निलेश राणे

Sonali Deshpande | Updated On: Mar 27, 2017 06:43 PM IST

अशोक चव्हाणांचं काम बेपत्ता आहे - निलेश राणे

27 मार्च : प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता निलेश राणेंनी ट्विटरवरून अशोक चव्हाणांविरोधात मोहीम सुरू केलीय. अशोक चव्हाण बेपत्ता असल्याचं निलेश राणेंनी ट्विट केलंय.आणि अशोक चव्हाण हटाव मोहीम सोशल मीडियावर सुरू केलीय.

यामध्ये निलेश राणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शेलकी टीका करताना अशोक चव्हाणांचं शरीर आहे पण काम बेपत्ता असल्याचं ट्वीट केलं आहे.

निलेश राणे यांनी पद सोडताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडलं होतं. गेले दीड वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी चव्हाण यांनी जिल्हा‌ध्यक्ष नेमला नाही, त्यामुळेच काँग्रेसला जिल्ह्यात पराभव पत्करावा लागला. या नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आलं. संघटनेचा कारभार अशा पद्धतीने चालणार असेल तर मला आपल्यासोबत काम करायचे नाही, असे म्हणत निलेश यांनी सरचिटणीसपद सोडले होते.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतरही निलेश हे स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी अशोक चव्हाणविरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 06:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close