S M L

... तर तीन महिन्यांची भर पगारी रजा

Sonali Deshpande | Updated On: Mar 21, 2017 01:41 PM IST

women-power21 मार्च : केंद्र सरकारची कर्मचारी असलेल्या महिलेनं जर शारीरिक शोषणाची तक्रार केली तर तिला आता 90 दिवसांची म्हणजे तीन महिन्यांची भर पगारी रजा मिळणार आहे. सरकारनं तसे कायद्यात बदल करायला घेतलेत. काही ठिकाणी पीडितेला धमकवण्याच्या घटना ऑफिसात घडलेल्या आहेत त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं समजतं.

पण 30 दिवसांच्या आत तक्रारीची चौकशी पूर्ण करायचीच आहे. ही रजा मंजूर करण्याचे अधिकार चौकशी समितीला देण्यात आलेत. तक्रार झाली तर त्यावर 15 दिवसांत निर्णय घ्यायचाच आहे.

सरकारच्या ह्या निर्णयावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतायत. काही महिला तीन महिन्यांची रजा मिळवण्यासाठी एखाद्यावर असे आरोप करणार नाहीत याची काय खात्री आहे असा सवाल विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 08:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close