S M L

जम्मूत पाकिस्तानच्या गोळीबारात साताऱ्याच्या जवानाला वीरमरण

Samruddha Bhambure | Updated On: Mar 10, 2017 08:39 AM IST

जम्मूत पाकिस्तानच्या गोळीबारात साताऱ्याच्या जवानाला वीरमरण

09 मार्च :  जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात महाराष्ट्रातील साताऱ्याचा जवान शहीद झाला आहे. दीपक जगन्नाथ घाडगे हे साताऱ्यातील बोरगावचे सुपुत्र होते.

काल दुपारी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्यांवर आणि पुंछ सेक्टरमध्ये एलओसीजवळ गोळीबार केला. त्यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र यामध्ये 27 वर्षीय दीपक जगन्नाथ घाडगे यांचा वीरमरण आलं.

दीपक घाडगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा आणि एक वर्षांची मुलगी असा परिवार आहे. शहीद दीपक यांचं पार्थिव आज संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहोचणार आहे. तर शनिवारी त्यांच्यावर मूळगावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, दीपक घाडगे यांना निधनानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 08:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close