S M L

लखनऊ अपडेट : दहशतवाद्यांकडून गोळीबार, चकमक अजूनही सुरूच

Sachin Salve | Updated On: Mar 8, 2017 12:03 AM IST

लखनऊ अपडेट : दहशतवाद्यांकडून गोळीबार, चकमक अजूनही सुरूच

08 मार्च :  उत्तर प्रदेशात लखनऊ शहराच्या बाहेरच्या भागातल्या एका घरात तीन दहशतवादी घुसले आहे. दुपारपासून चकमक सुरूच आहे. रात्री या दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय. दहशतवादी आणि पोलिसांमध्ये अजूनही चकमक सुरूच आहे.

लखनऊजवळच्या ठाकुरगंज भागात हाजी कॉलनीमध्ये दुपारच्या सुमारास हे दहशतवादी घुसले. ठाकुरगंज भागाच्या आसपासच्या परिसरात पोलिसांनी जमावबंदी केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 कमांडोंनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतलाय. या पथकात एटीएसच्या कमांडोंचाही समावेश आहे. गुप्तचर विभागाने लखनऊजवळच्या एका घरात दहशतवादी घुसल्याची खबर पोलिसांनी दिली आणि नंतर हे ऑपरेशन सुरू झालं.

मध्य प्रदेशमध्ये सोमवारी ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती. यामध्ये 9 जण जखमी झाले. हा स्फोट घडवून आणणारे दहशतवादी आणि लखनऊजवळ घरात घुसलेले संशयित दहशतवादी यांच्यामध्ये काही संबंध असावा, अशीही माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 12:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close