S M L

प्राध्यापक साईबाबासह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2017 04:27 PM IST

प्राध्यापक साईबाबासह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

 07 मार्च : माओवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक जी एन साईबाबासह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. तर एकाला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. जी एन साईबाबाला झालेली ही शिक्षा म्हणजे माओवादाला जबर हादरा बसलाय.

प्राध्यापक गोकराकोंडा नागा साईबाबा हा दिल्ली विद्यापीठाच्या रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे. अहेरी पोलिसांनी त्याला राज्य शासनाने बंदी घातलेल्या सीपीआय-मोवोवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या कारणावरून ९ मे २०१४ रोजी अटक केली होती.

माओवाद पसरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सेटिंग करणे, इतर देशातल्या फुटीरवादी आणि दहशतवाद्यांशी संधान साधणे, याचाही साईबाबावर आरोप आहे. देशाविरोधात युद्ध छेडण्याचा गंभीर गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे.

साईबाबा याने जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा खटला दररोज चालवण्याचे आदेश दिले होते. आज गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

साईबाबा यांच्यासह प्रशांत राही, हेम मिश्रा, विजय तिरकी, महेश तिरकी आणि पांडू नरोटे यांना देशविघातक कृत्य, बंदी संघटनांचा सदस्य असणे, प्रचार करणे आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. विजय तिरकीला १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close