S M L

तुमच्या पैशावर बँकांचा 'दरोडा', पाचव्या व्यवहारानंतर द्यावा लागणार चार्ज

Samruddha Bhambure | Updated On: Mar 2, 2017 02:17 PM IST

तुमच्या पैशावर बँकांचा 'दरोडा', पाचव्या व्यवहारानंतर द्यावा लागणार चार्ज

02 मार्च :  शाखेत जाऊन किंवा एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यासाठी आज जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आपल्या बँकेतून 4 वेळा पैसे काढल्यावर पाचव्या वेळीपासून हा चार्ज द्यावा लागणार आहे. प्रत्येक वेळा पैसे काढताना 150 रुपये, एवढा हा चार्ज आहे.

लोकांनी कॅशचा वापर कमी करावा, कॅश जास्त काढू नये, यासाठी हा चार्च आकारायला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या खात्यासाठी हा चार्ज लागू होणार नाहीये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ब्रँचमधून पैसे काढले, तर 2 लाखांपर्यंत हा चार्ज लागणार नाही. पण एटीएममधून काढले किंवा दुसऱ्या शाखेतून काढले, तर चार्ज लागणारच.

अनेक खासगी बँकांनी कालपासून हे पैसे घ्यायला सुरुवात केलीय. सरकारी बँका सध्या तरी हे पैसे आकारत नाहीय.

नेमकी कशी आहे ही आकारणी ?

- महिन्याला ४ वेळा पैसे काढणं, जमा करणं फ्री

- पाचव्या वेळेपासून प्रत्येक व्यवहारासाठी १५० रु. चार्ज

- ३० हजारांपर्यंतच १५० रु. चार्ज

- त्यानंतर प्रत्येक हजारामागे ५ रु. द्यावे लागणार

- आपल्या शाखेतून पैसे काढले तर २ लाखांपर्यंत चार्ज नाही

- पण आपल्या बँकेच्या एटीएममधूनही काढले तर चार्ज लागू

- ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना लागू नाही

- कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवा चार्ज

या नव्या नियमानुसार पैसे काढणे आणि पैसे बँकेत भरणे (थेट बँकेतून किंवा एटीएममधून) अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहाराचा समावेश आहे. हा नियम 1 मार्चपासून सेव्हिंग आणि सॅलरी अकाउंटवर लागू करण्यात आला आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या खासगी बँकांमध्ये हे नवीन नियम लागू होणार आहेत. दरम्यान, प्रत्येक बँकेचे नियम आणि चार्जेस यासाठी वेगळे आहेत.

एचडीएफसी बँक

- महिन्याला मोफत व्यवहार : ४

- एका व्यवहाराचा चार्ज : १५० रु. किंवा हजारामागे ५ रु.

- आपल्या शाखेतून मोफत काढता येणार : महिन्याला २ लाख

आयसीआयसीआय बँक

- महिन्याला मोफत व्यवहार : ४

- एका व्यवहाराचा चार्ज : १५० रु. किंवा हजारामागे ५ रु.

- आपल्या शाखेतून मोफत काढता येणार : महिन्याला २ लाख

अॅक्सिस बँक

- महिन्याला मोफत व्यवहार : ५

- एका व्यवहाराचा चार्ज : ९५ रु. किंवा हजारामागे २.५० रु

- आपल्या शाखेतून मोफत काढता येणार : महिन्याला २ लाख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 08:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close