S M L

अमिताभजी, गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नये - अखिलेश यादव

Samruddha Bhambure | Updated On: Feb 20, 2017 04:48 PM IST

अमिताभजी, गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नये - अखिलेश यादव

20 फेब्रुवारी : गुजरातच्या गाढवांसाठी प्रचार करू नका असा अमिताभ बच्चन यांना सल्ला देत अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते परस्परांवर जोरदार हल्ले चढवत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अखिलेश यादव यांनी ही बोचरी टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

ते रायबरेलीत एका प्रचारसभेत बोलत होते. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सध्या शाब्दिक चकमकी घडतायत. काल पंतप्रधानांनी जशी ईदला सगळ्यांना 24 तास लाईट असते, तशी लाईट दिवाळीलाही मिळायला पाहिजे असं म्हणत अखिलेशवर निशाना साधलाय. त्याला उत्तर देताना अखिलेश यांनी अमिताभ बच्चन हे गुजरात राज्याच्या पर्यटन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. गुजरात सरकारच्या नव्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन गुजरातमध्ये आढळणाऱ्या गाढवांची जाहिरात करताना दिसत आहेत. त्याचा संदर्भ देत, अमिताभ यांनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नये, असं अखिलेश म्हणाले.

अखिलेश यांचं हे वक्तव्य भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागलं असून भाजपकडून त्यास जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close