S M L

कानपूर रेल्वे अपघाताचा सूत्रधार शमशुल हुडाला नेपाळमध्ये अटक

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2017 10:35 PM IST

  KANPUR - Copy07 फेब्रुवारी : कानपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या रेल्वे अपघाताचा मुख्य सूत्रधार शमशुल हुडा याला नेपाळची राजधानी काठमांडूमधून अटक करण्यात आलीय. शमशुल हुडा याचा अनेक रेल्वे अपघातात हात असल्याचं सांगण्यात येतंय. रेल्वे ट्रॅकवर स्फोटकं पेरून रेल्वेचे अपघात घडवून आणायचे, असा या शमशुल हुडाचा कट होता.

बिहारमध्ये पूर्व चंपारणमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोटकं ठेवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता. तसंच कानपूरमध्ये इंदोर- पाटणा एक्स्प्रेसला झालेला अपघात, आंध्र प्रदेशमध्ये झालेला कोनेरू रेल्वे अपघात या दुर्घटनांबद्दल नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा युद्धपातळीवर तपास करतेय. शमशुल हुडाची चौकशी करण्यासाठी एनआयए नेपाळमधल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

भारतामध्ये रेल्वे अपघात घडवून अशांतता निर्माण करण्याचा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा डाव आहे, असा बिहार पोलिसांना संशय आहे. त्यानुसार, एनआयए आणि त्या त्या राज्यांमधले पोलीस रेल्वे अपघातांचा तपास करतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 10:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close