S M L

दिल्लीत प्रदूषणामुळे होतो रोज 8 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2017 10:27 PM IST

दिल्लीत प्रदूषणामुळे होतो रोज 8 जणांचा मृत्यू

07 फेब्रुवारी : दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे रोज 8 जणांचा मृत्यू होतो, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. तसंच 3 मुलांमागे एका मुलाला प्रदूषणामुळेच फुफ्फुसाचे विकार जडतायत, असंही समोर आलंय. सुप्रीम कोर्टानेच दिल्लीच्या प्रदूषणासंबंधीच्या एका खटल्यामध्ये ही आकडेवारी दिलीय.

सरकारने राजधानी दिल्लीच्या परिसरात जास्त आर्द्रता असलेलं इंधन-फर्नेस ऑइल आणि कोळशाच्या वापरावर बंदी घालण्याचा विचार करावा, असे निर्देशही कोर्टाने दिलेत. दिल्लीतल्या हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावतोय त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवेत, असं कोर्टाने म्हटलंय.

बोस्टनमधल्या एका संस्थेने 2010 साली केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला देत कोर्टाने ही आकडेवारी सगळ्यांसमोर आणलीय. दिल्लीमधल्या प्रदूषणामुळे  दरवर्षी ३ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो, असं कोर्टाने म्हटलंय. दिल्ली  दिल्लीचं प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना 2आठवड्यांत सरकारला सादर कराव्या, असंही कोर्टाने सुनावलंय.

दिल्लीमध्ये वाहनांची संख्या वाढल्यामुळे याआधी सरकारने सम-विषम क्रमांकाच्या गाड्यांना परवानगी देण्याचा प्रयोग करून पाहिला होता. आता हा प्रयोग स्थगित करण्यात आलाय. दिल्लीमधलं प्रदूषण हे वाहनांमुळे होत नसून धुळीमुळे होतंय, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. पण कोर्टाने त्यावर प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 10:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close