S M L

कैलाश सत्यार्थींचा नोबेल पुरस्कार घरातून चोरीला

Samruddha Bhambure | Updated On: Feb 7, 2017 01:13 PM IST

कैलाश सत्यार्थींचा नोबेल पुरस्कार घरातून चोरीला

07  फेब्रुवारी :   नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार चोरील गेला आहे. काल सोमवारी रात्री ही घटना घडली.

कैलाश सत्यार्थी सध्या काही कामानिमित्त अमेरिकेत आहेत. हीच वेळ साधून चोरट्यांना काल रात्री त्यांच्या घरावर डल्ला मारल्याची माहिती मिळत आहे. चोरट्यांनी कैलाश सत्यार्थी यांच्या घरातील अनेक वस्तू लंपास केल्या. यामध्ये सत्यार्थी यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराचाही समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याठिकाणी चोरांच्या हातापायांचे ठसे शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसूफजाई यांना २०१४ मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. लहान मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी सत्यार्थी यांनी बचपन बचाओ आंदोलन ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. याच कामाचा गौरव म्हणून त्यांना नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

दरम्यान, कैलाश सत्यार्थी यांचे नोबेल सर्टीफिकेट चोरीला गेले, त्यांनी आपला पुरस्कार देशाला अर्पण केल्यामुळे तो राष्ट्रपती भवनात असल्याची माहिती कैलाश सत्यार्थी यांच्या कार्यालयाने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close