S M L

जलीकट्टूच्या समर्थनार्थ ए.आर.रहमान करणार एक दिवसाचा उपवास

Samruddha Bhambure | Updated On: Jan 20, 2017 10:14 AM IST

जलीकट्टूच्या समर्थनार्थ ए.आर.रहमान करणार एक दिवसाचा उपवास

rahman-759

20 जानेवारी :  जलीकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान आज (शुक्रवारी) एक दिवसाचा उपवास करणार आहे. रहमानसारख्या व्यक्तीला उपवास करावासा वाटतो  म्हणजेच यात बरंच काही आलं. फक्त रहमानच नाही तर अभिनेता कमल हसन, विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यासारखे एक ना अनेक दिग्गजांनी जलीकट्टूचं समर्थन केलंय. चेन्नईच्या मरिना बीचवर शांततामय आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.

काही घटना बातम्या अशा असतात की त्या आपल्याला आरसा दाखवत रहातात. आपल्याला प्रश्नांच्या घेऱ्यात उभे करतात. गेल्या तीन दिवसांपासून चेन्नईसह अख्ख्या तामिळनाडूत  तामिळ जनता रस्त्यावर उतरलीय. त्याला कारण आहे ते जल्लीकट्टूवर सुप्रीम कोर्टानं घातलेली बंदी.

जलीकट्टूच्या खेळात बैलांवर अत्याचार होत असल्याचं सांगत प्राणीप्रेमी संघटनांनी केलेल्या याचिका दाखल केली होती. लोकांचे सन, उत्सव यात ना सरकार, ना कोर्टनं लुडबूड करू नये अशी मागणी आणि चर्चा सोशल मीडियापासून ते चेन्नईतल्या आंदोलकांपर्यंत सगळीकडे सुरू आहे. या खेळाला जवळपास 2 हजार वर्षांचा इतिहास असल्याचा आंदोलकांचा दावा आहे. शिवाय खेळात बैलांविरोधात कुठलहीं क्रौर्य नसल्याचंही आंदोलकांचं म्हणणं आहे. वर्षांनुवर्षांचा इतिहास आणि प्राणीप्रेमी संघटनांचा अडेलतट्टू कारभार यामुळे आता जलईकट्टूचा प्रश्न तमिळ अस्मितेशी जोडण्यात आला असून सोशल मीडियावर त्यासंदर्भात जोरदार चर्चा झडतेय.

शिवाय तमिळ अस्मितेवर घाला घातला जात असल्याचा दावा करून राज्यातल्या तरुणाईला आंदोलनात सामील होण्याचं आवाहनही करण्यात येतय. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळतोय. तमिळ सेलिब्रिटी आणि समाजातल्या महत्वाच्या व्यक्ती भूमिका घ्यायला कधीच मागे पुढे बघत नाहीत. त्याचाच प्रत्यय या आंदोलनातही येतोय.

दरम्यान पंतप्रधानांशी चर्चेनंतर आज सकाळी मुख्यमंत्री पनीर सेल्वम यांनी जलीकट्टूवरची बंदी उठवण्यासाठी नवा अध्यादेश काढण्यात येईल असं आंदोलकांना सांगितलंय. अध्यादेशाचा मसूदा केंद्राकडे पाठवण्यात आला असून येत्या दोन दिवसात त्याला मंजूरी मिळाली की लगेच तो जारी करण्यात येईल असं पनीरसेल्वम यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close