S M L

सज्ञान मुलाला पोसायला पालक बांधिल नाहीत :कोर्ट

Sachin Salve | Updated On: Nov 30, 2016 12:22 PM IST

Delhi High court30 नोव्हेंबर : पालक आपल्या सज्ञान मुलांना घरात ठेवायला आणि त्यांना पोसायला बांधिल नाहीत, असा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिलाय. एका याचिकेवर सुनावणी दरम्यान दिल्ली कोर्टाने हा निर्णय दिलाय.

सज्ञान मुलांना घरात राहू द्यायचं की नाही, हा पूर्णपणे पालकांचा निर्णय आहे. त्यांची मर्जी तसं त्यांनी करावं, असं कोर्टाने म्हटलंय. पण यासाठी घर पालकांच्याच मालकीचं असावं. जर ते घर पालक आणि मुलगा, अशा तिघांच्या नावावर असेल, तर मात्र मुलाला काढू शकत नाही, असा निर्णय कोर्टाने दिलाय. केवळ जन्म दिला म्हणून आयुष्यभर मुलांना पोसण्याची जबाबदारी पालकांची नाही, असंही महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टानं नोंदवलं.

दिल्ली हायकोर्टाने आपल्या आदेशात नेमकं काय म्हटलंय ?

"पालकांचं घर स्वकष्टार्जित असेल तर मुलाचं लग्न झालं असो वा नसो, पालकांच्या घरी राहण्याचा त्याला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. पालकांची मर्जी असेल तरच मुलगा तिथे राहू शकतो. आतापर्यंत संबंध चांगले असल्यामुळे मुलाला राहू दिलं म्हणून आयुष्यभर त्याचा भार पालकांनीच उचलावा असं नाही."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 30, 2016 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close