S M L

देशभरातल्या बँकांमध्ये 5. 45 ट्रिलियन रुपये जमा -रिझर्व्ह बँक

Samruddha Bhambure | Updated On: Nov 21, 2016 07:25 PM IST

nashik_currency

21 नोव्हेंबर: देशभरातल्या बँकांमध्ये 5.45 ट्रिलियन रुपये जमा झालेत, असं रिझर्व्ह बँकेने जाहीर केलंय. या सगळ्या रकमेची

डॉलरमध्ये किंमत 80 अब्ज डॉलर्स एवढी होते. 10 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या काळात रिझर्व्ह बँकेत एवढी मोठी रक्कम झालीय. एक ट्रिलियन म्हणजे एकावर 12 शून्य एवढी रक्कम. बँक खात्यांमध्ये 5. 12 ट्रिलियन रुपये जमा झालेत आणि नोटबदलीमुळे 33 हजार कोटी रुपये जमा झालेत.

सध्या खातं असलेल्या बँकेतून लोक आठवड्याला 24 हजार रुपये काढू शकतात. त्याशिवाय रिझर्व्ह बँकेने आणखी काही घोषणा केल्यायत. उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी यामध्ये काही घोषणा आहेत. उद्योजक आणि व्यापारी ओव्हरड्राफ्टच्या मदतीने आणि त्यांच्या कॅश क्रेडिट अकाउंटमधून आठवड्याला 50 हजार रुपये काढू शकतात.

देशभरातलं वापरातलं 86 % चलन बाद झाल्यामुळे विशेषत: ग्रामीण भागात चलन तुटवडा आहे. पण याठिकाणी

नवं चलन पुरवलं जाईल, अशी हमी रिझर्व्ह बँकेने दिलीय.

शेतकऱ्यांनाही काही सवलती देण्यात आल्यायत. सध्या रब्बीचा पेरणी हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणं खरेदीची करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी जुन्या नोटा देऊन बियाणं खरेदी करू शकतात,असं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय. सरकारी बियाणं केंद्र, कृषी विद्यापीठं अशा संस्थांमधून जुन्या नोटा देऊन बियाणं खरेदी करण्याची सवलत देण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2016 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close