S M L

नागपूरमध्ये भाजप आमदारांच्या मुलांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 21, 2016 05:21 PM IST

नागपूरमध्ये भाजप आमदारांच्या मुलांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

21 नोव्हेंबर : भाजपचे नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या 2 मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय. अभिलाष खोपडे आणि रोहित खोपडे या दोघांवर हा गुन्हा दाखल झालाय. अभिलाष आणि रोहित हे त्यांच्या मित्रासोबत क्लाऊड - 9 या बारमध्ये गेले होते. या ठिकाणी खाद्यपदार्थ न मिळाल्यामुळे त्यांचं बारमधल्या कर्मचार्‍याशी भांडण झालं. या भांडणात अभिलाष खोपडेने बारची तोडफोड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एवढचं नाही तर अभिलाष आणि रोहित यांनी बारच्या मॅनेजरला रॉडने मारहाण केला. त्यामध्ये तो जखमी झाला.

क्लाऊड - 9 बारच्या मालकाने काही गुंड बोलावून अभिलाष आणि रोहितच्या साथीदारांवर हल्ला केला. यात या अभिलाष आणि रोहितचा मित्र शुभम महाकाळकर याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केलीय. अभिलाष खोपडे आणि रोहित खोपडे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यांत गुंडगिरी वाढत चाललीय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अशातच सत्ताधारी भाजप आमदारांची मुलंच जर अशी गुंडगिरी करत असतील तर कायद्याचा धाक कुणाला आहे की नाही, असा प्रश्न पडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2016 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close