S M L

आता राष्ट्रीय महामार्गांवर 24 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी

Sachin Salve | Updated On: Nov 17, 2016 07:17 PM IST

gujrat_toll17 नोव्हेंबर : नोटबंदीमुळे त्रस्त असलेल्या सामान्यांना केंद्र सरकारने आज पुन्हा एक दिलासा दिला. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफीची मुदत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आलीये. केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिलीये.

500 आणि 1000 च्या नोटबंदीमुळे सुट्टापैशांची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेतला. आज सलग तिस-यांदा टोलमाफीमध्ये वाढ करण्यात आलीये. याअगोदर टोलमाफी 18 नोव्हेंबरपर्यंत होती. ती आता सहा दिवसांनी वाढवण्यात आलीये. राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या टोलबाबत अजून निर्णय झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2016 07:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close