S M L

आता बँक खात्यातून कितीही पैसे काढा, नो टेन्शन !

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2016 03:12 PM IST

आता बँक खात्यातून कितीही पैसे काढा, नो टेन्शन !

14 नोव्हेंबर : आजपासून बँक खातं असलेल्या बँकेतून एकाहून जास्त वेळा पैसे काढण्याची अनुमती सरकारने दिलीये. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय मात्र, एटीएममधून फक्त 2500 रुपये काढता येणार आहे.

नोटबंदीच्या निर्णयानंतर रविवारी रात्री पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री, वित्तमंत्री आणि आयआरबीचे गव्हर्नर उपस्थित होते.

बँकांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर पैसा जमा झालाय. आणि नव्या नोटांची छपाईसुद्धा जोरात सुरू आहे. त्यामुळे बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा शिथील करण्यात आलीये. तसंच शासकीय रूग्णालयांमध्ये पैशांची टंचाई दूर करण्यासाठी त्याठिकाणी मायक्रो एटीएम सुरू करण्यात येणार असल्याचंही अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय. त्याचबरोबर एटीएममधून काढण्यात येणा-या पैशाच्या कमाल मर्यादेबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2016 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close