S M L

जेएनयू-डीयूच्या प्राध्यापिकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Nov 8, 2016 03:58 PM IST

जेएनयू-डीयूच्या प्राध्यापिकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

08 नोव्हेंबर : विविध कारणांमुळे वादात सापडलेल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजेच जेएनयू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. जेएनयूच्या एका प्राध्यापिकेच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचं बरोबर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिकेच्या नावाचाही यात समावेश आहे.

जेएनयूच्या प्राध्याप्रिका अर्चना प्रसाद आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका नंदिनी सुंदर अशी या दोन प्राध्यापिकांची नावं आहे. नक्षलप्रभावित छत्तीसगडमधील सुकमामध्ये शामनाथ बघेल नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याच्या गुन्ह्यात या दोघींवर गुन्हा दाखल झाला आहे.

छत्तीसगडच्या तोंगपाल पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झालेत. नंदिनी सुंदर या नागरी हक्क कार्यकर्त्याही आहेत. त्यांनी माओवादावर अनेक पुस्तकंही लिहिलियेत. त्यांनी बस्तरमध्ये जाऊन कामही केलंय. शामनाथ याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. त्यामुळे छत्तीसग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे.

कोण आहेत नंदिनी सुंदर?

- दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्राच्या प्राध्यापिका

- माओवाद या विषयावर काम

- नागरी हक्क कार्यकर्त्या

- माओवाद, पर्यावरण आणि नागरी हक्कांवर अनेक पुस्तकं लिहिली

- 2010मध्ये इन्फोसिस पुरस्कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2016 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close