S M L

वन रँक वन पेन्शनचं राजकारण; निवृत्त सैनिकाच्या अंत्यसंस्कारासाठी राहुल गांधी भिवानीत

Samruddha Bhambure | Updated On: Nov 3, 2016 12:35 PM IST

वन रँक वन पेन्शनचं राजकारण; निवृत्त सैनिकाच्या अंत्यसंस्कारासाठी राहुल गांधी भिवानीत

03 नोव्हेंबर - दिल्लीतील जंतरमंतरवर 'वन रँक वन पेन्शन'च्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्या रामकिशन ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतली. हरियाणातील भिवानी या त्यांच्या मूळगावी जाऊन राहुल यांनी ग्रेवाल कुटुंबियांचं सांत्वन केलं. राहुल गांधी  ग्रेवाल यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील भिवानी गावात थोड्याच वेळात दाखल होणार आहेत.

वन रँक वन पेन्शनच्या अंमलबजावणीत विलंब होत असल्याने काल (बुधवारी) हरियाणातील रामकिशन गढेवाल यांनी दिल्लीत आत्महत्या केली होती. ग्रेवाल यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. मोदी सरकार लोकशाहीविरोधी आहे आणि सैनिकाच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून कुणाला रोखण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. तर हा मोदीजींचा भारत आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

दरम्यान, आज (गुरुवारी) सकाळी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते रामकिशन ग्रेवाल यांच्या गावी दाखल झाले.अरविंद केजरीवाल हेदेखील भिवानीच्या दिशेने रवाना झाले आहेत.  ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी अटक करणं आणि त्यांना मारहाण करणं हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2016 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close