S M L

पाकच्या गुप्तहेर अधिकाऱ्याला तातडीने भारत सोडण्याचे आदेश

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2016 07:28 PM IST

पाकच्या गुप्तहेर अधिकाऱ्याला तातडीने भारत सोडण्याचे आदेश

27 ऑक्टोबर : दिल्ली पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याची सुटका केली असून त्याला तातडीने भारत सोडून जायला सांगितलं आहे. मेहमूद अख्तर असं या पाकिस्तानी अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्या सोबत दोन भारतीयांना देखील ताब्यात घेतलं आहे.

भारताने पाकिस्तानी गुप्तहेरांच्या जाळ्याचा पर्दाफाश केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. मेहमूद अख्तरकडे भारतीय लष्करासंबंधीची गोपनीय कागदपत्रं सापडली. या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचरण केलं.

मेहमूद अख्तरला त्याच्या कुटुंबासोबत 48 तासात भारत सोडून जायला सांगितलंय. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन भारतीय नागरिकांचे नाव सुभाष आणि मौलवी रमजान आहे. यातील सुभाषला अर्थिक अडचण आल्यामुळे त्याने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला मदत केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या प्रकरणी आखणी एक व्यक्ती फरार आहे. याचे नाव शोएब असे समोर येते आहे .त्या संदर्भात पोलीस चौकशी करत असून त्यालाही लवकर अटक करू असे दिल्ली क्राईम ब्राचकडून सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2016 07:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close