S M L

'तीन तलाक'ला तलाक कधी मिळणार ?

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2016 07:08 PM IST

'तीन तलाक'ला तलाक कधी मिळणार ?

26 ऑक्टोबर : तीनदा तलाकचा मुद्दा सध्या गाजतोय. मुस्लीम महिलांवर अत्याचार करणारी ही प्रथा बंद होण्यासाठी आवाज उठतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या तीन तलाकला विरोध केलाय. पण या पद्धतीला कायमची मूठमाती देण्याची खरोखरच राजकीय इच्छा आहे का हा खरा प्रश्न आहे.

निकाह सिनेमा 34 वर्षांपूर्वी जेव्हा रिलीज झाला, तेव्हा तीन तलाकची वेदना काय असते याची जाणीव झाली. पतीनं सोडून दिल्यानं एकट्या पडलेल्या महिलेची अवस्था मांडणा•या निकाह सिनेमाच्या डॉयलॉग्जना फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला. पण ख-या आयुष्यात मुस्लीम महिलांचं हे दु:ख आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये पतीनं आपल्या पत्नीला तलाक दिला. कारण अगदीच क्षुल्लक होतं. मोबाईल चोरला म्हणून पत्नीनं पतीला खडसावलं होतं. ताजं उदाहरण पुण्याचं आहे. 18 वर्षांच्या आशिया बागवानला तिच्या पतीनं जबरदस्तीनं तलाक दिला. त्यानं हासुद्धा विचार नाही केला की तिच्या आठ महिन्यांच्या कोवळ्या बाळाचं काय होईल.

तीनदा तलाकचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंतर पुन्हा चर्चेत आलाय. आता तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रथेला कडाडून विरोध केलाय.

जीवन उद्धवस्त करणा-या या कुप्रथेतून मुस्लीम महिलेला बाहेर काढण्याची संधी शहाबानो या 62 वर्षांच्या महिलेनं 1985 मध्ये दिली होती. पण सनातनी मुस्लिमांच्या दबावाला बळी पडत राजीव गांधी सरकारनं संख्याबळाच्या जोरावर सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाला बगल दिली. आणि मुस्लीम महिलांना अंधाराच्या खाईत लोटलं. तेव्हापासून तीनदा तलाकाचा मुद्दा राजकारणाच्या फे-यात अडकलाय.

अनेक मुस्लीम देशांमध्ये तीन तलाकला मूठमाती देण्यात आलीय. पण भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात अजून ही कुप्रथा जिवंत आहे, हे दुदैर्व...काँग्रेस सरकारनं यावर राजकारण केलं आता भाजपला खरोखरच मुस्लीम महिलांची या जोखडातून मुक्तता करायची आहे, की केवळ राजकीय वातावरण तापवायचं आहे, हा खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2016 07:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close