S M L

वरुण गांधी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2016 10:54 PM IST

वरुण गांधी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप

20 ऑक्टोबर : नेहमी आपल्या विधानामुळे अडचणीत सापडणारे भाजपचे खासदार वरुण गांधी आता वेगळ्या प्रकरणामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. वरुण गांधींवर हनीट्रॅप झाल्याचा आरोप झालाय. शस्त्रास्त्रांचा दलाल अभिषेक वर्मानं वरुण गांधींना ब्लॅकमेल केलं? असं पत्रच अमेरिकी व्हिसलब्लोअर एडमंड्स ऍलेनचं पंतप्रधान कार्यालयाला लिहिलं आहे.

या पत्रासोबत वरुण गांधींचे काही आक्षेपार्ह फोटोही पाठवले आहे.नौदल आणि हवाई दलाचे अधिकारीही या अडकल्याचा दावा वकिल प्रशांत भूषण यांनी केलाय. त्याचेही तपशील पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवण्यात आले आहे. वरुण गांधी संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यावेळी अभिषेक वर्माला संरक्षणविषयक तपशील मिळत असल्याचा एडमंड्स ऍलेनच्या पत्रात दावा केलाय.

मात्र, वरुण गांधी यांनी स्वत:वरचे आरोप फेटाळले आहेत. "मी 21 वर्षांचा होतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा मी अभिषेक वर्माला भेटलो आणि त्यानंतर पुन्हा कधीही भेटलो नाही. माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही आणि जे काही बोलले जात आहे ते चूक आणि निराधार आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2016 10:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close