S M L

मथुरानगरी हिंसाचाराने हादरली, 2 पोलीस अधिकार्‍यांसह 21 ठार

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2016 12:22 PM IST

मथुरानगरी हिंसाचाराने हादरली, 2 पोलीस अधिकार्‍यांसह 21 ठार

03 जून : मथुरेमध्ये अनधिकृत जागा खाली करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी घडली. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात 21 जणांचा मृत्यू झालाय. यात मथुरेचे एसपी मुकुल द्विवेदी आणि आणखी एका पोलीस अधिकार्‍याचा समावेश आहे. या गोळीबारात 6 आंदोलनकर्तेही ठार झाले.

मथुरेच्या जवाहर पार्कमध्ये गेल्या 2 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. स्वाधीन भारत सुभाष सेना या संघटनेचे कार्यकर्ते हे आंदोलन करतायेत. कोर्टाच्या आदेशानुसार जवाहर पार्कमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची कुमक गेली होती. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी थेट गोळीबार सुरू केला. 100हून जास्त जण यात जखमी झाले आहेत. आज सकाळी पार्कमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडलाय. 315 बोरच्या 45 बंदुका पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

या प्रकरणाचा तपास आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एसओ संतोष यादव आणि मुकुल द्विवेदी यांच्याबद्दल दु:ख व्यक्त केलंय. तसंच त्यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत जाहीर केलीये.

दोन वर्षांपूर्वी बाबा जय गुरुदेवपासून वेगळे झालेले कार्यकर्ते स्वता:ला 'आझाद भारत विधिक विचारक क्रांती सत्याग्रही' घोषित केलं होतं. तेव्हापासून ते आंदोलनावर ठाम राहत जवाहर बागमध्ये शेकडो एकर भूमीवर कब्जा केला होता. राष्ट्रपती आणि पंतप्रधान निवडीची प्रक्रिया रद्द करावी, एका रुपयात 60 लिटर डिझेल आणि एका रुपयात 40 लिटर पेट्रोलची विक्री करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे. इलाहाबाद हायकोर्टाने एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान जवाहर बागमधील ही जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. स्वाधिन भारत विधिक सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष रामबृक्ष यादव यांच्यासह हजारो कार्यकर्ते शस्त्रसाठ्यासह रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे हा हिंसाचार घडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2016 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close